राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कारांचे सोलापुरात ७ जानेवारीला होणार वितरण

गोखले, बाविस्कर, गायकवाड, महाजन पुरस्काराचे मानकरी  

सोलापूर √ लोकमंगल फाउंडेशन आयोजित लोकमंगल वाचनालय पुरस्कृत राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दि. 7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा निर्मला पाटील यांचे आत्मकथन ( कादंबरी मौज प्रकाशन गृह, मुंबई ) –  शांता गोखले , काळ्यानिळ्या रेषा आत्मचरित्र ( राजहंस प्रकाशन, पुणे ) – राजू बाविस्कर ,  गोतमबुद्ध कादंबरी ( मेहता पब्लिशिंग, पुणे ) – वसंत गायकवाड हे 2023 चे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत 25 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार : संस्था – कलासक्त, पुणे  ( केल्याने भाषांतर – त्रैमासिक )  – सुनंदा महाजन यांना जाहीर झाला आहे.  25 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार हा झांबळ  कथासंग्रह (मनोविकास प्रकाशन) –  समीर गायकवाड यांना ११ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर अशा स्वरुपात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
लोकमंगल साहित्य पुरस्काराचं हे नववं वर्ष असून
या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून
एबीपी माझाचे (मुंबई) संपादक राजीव खांडेकर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित रहावे,असे आवाहन लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे. 
या पत्रकार परिषदेस पुरस्कार निवड समितीचे सदस्य नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे,शिरीष देखणे , डॉ. दत्ता घोलप,समन्वयक शोभा बोल्ली, अनिता ढोबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *