सोमपा पत्रकार संघाच्या वतीने विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवारांचा सत्कार

सोलापूर √ सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त तथा विद्यमान विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा सोमपा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार हे काल सोलापुरात आले असता त्यांचा सह्रदय सत्कार करण्यात आला यावेळी सल्लागार प्रशांत जोशी, शिवाजी सुरवसे, वेणूगोपाल गाडी, रामेश्वर विभुते, जाकीर हुसेन पिरजादे, विकास कस्तुरे, प्रभुलिंग वारशेट्टी, मकरंद ढोबळे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
       यावेळी विभागीय उपायुक्त गुडेवार यांनी सोलापूर महापालिकेत आयुक्त असतानाच्या कार्यकाळातील अतिक्रमण कारवाईसह विविध योजना संदर्भात आणि विविध आठवणींना उजाळा दिला दरम्यान, सोलापुरात बदल झाल्याचे दिसत असल्याचे आवर्जून त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *