इतिहास परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूरात

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद

सोलापूर √ सोलापूर शहरात दि 30 डिसेबर से 31 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे राज्यस्तरीय अशा पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते सोलापूरातील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदीर ( होटगी महाराज मठ ) येथे होणार असल्याची माहिती संयोजक प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी जिल्हा अध्यक्ष प्रा. संजय जाधव सरांनी पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनात महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या शिक्षकाचे शिक्षणातील नवउपक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इतिहास विषयांतील अध्यापनाच्या ऐतिहासिक वस्तु, वास्तु, स्टँप तिकीट, नाणी टपाल इत्यादी माहिती सोबतच अध्यापनातील इतिहास शिक्षकांची भूमिका सध्य स्थितीत इतिहासाचे महत्व या विविध विषयावर महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षकांचे प्रबोधनात्मक राज्यस्तरीय अधिवेशन भरवून या अधिवेशनातून शिक्षकांच्या नवउपक्रमातून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी तसेच सोलापूर शहर व जिल्हातील ऐतिहासिक धार्मिक व पर्यटनांचा इतिहास राज्यस्तरावर पोहचण्यासाठी या अधिवेशनातून सोलापूर जिल्हाची ऐतिहासिक परंपरेची स्मरणिकेच्या माध्यमातून राज्यभर पोहचवण्याचा प्रयत्न होणार आहे.

सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व लोक प्रतिनिधींच्या उपस्थित पहिल्या दिवशी तीन सत्रांत कार्यक्रम संपन्न होणार आहे समारोपीय सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम ऐतिहासिक लाटी काठी व तलवारबाजी यांचे माहितीसह
प्रात्यक्षिके दाखविले जाणार असून समारोपीय सत्रात राज्यस्तरातून उपक्रम शिल गुणवंत अशा ३० शिक्षकांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे या कार्यक्रमांस सिंधखेड राजा गादीचे वारदार शिवाजीराजे जाधवराजे पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर आमदार अभिजित वंजारी आमदार सुधाकर आडबाले माजी आमदार दत्तात्रय सांवत प्रा. सुनिल शिंदे तसेच सुमारे पाचशे राज्य कार्यकारणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील इतिहास प्रेमी शिक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले या पत्रकार परिषदेस प्रा.जैन्नुदिन पटेल प्रा. गौरीशंकर बिराजदार, प्रा.पुष्पा विभुते प्रा.श्रीधर सगेल, प्रा.मिनाक्षी गेडपल्ली, प्रा शंकर कोगलवार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *