श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये ‘श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना’ सोहळा संपन्न

सोलापूर √ अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा निमित्त प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 21 जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधवी रायते, डॉ. टी. सुरेशकुमार व डॉ.निता अळंगे हे उपस्थित होते यावेळी अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला हॉस्टेल प्रमुख पौर्णिमा शिवपुजे व रेक्टर संगिता लकशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी हा कार्यक्रम उत्तम पद्धीतीने साजरा केला प्रथम ‘राममंदिर’ प्रतिकृतीचे व प्रतिमेचे पुजन केले गेले त्यानंतर डॉ. माधवी रायते यांनी मुलींना “उत्तम जीवन जगावे व उत्तम नागरिक बनुन समाजासाठीच आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे अशी एक सुंदर समजुतीची गोष्ट त्यांनी मनोगतात व्यक्त केली

गौरी पाटील व तन्वी काळदाते यांनी सुरेख अशी रांगोळी साकारली तसेच अनुजा कुलकर्णी यांनी सुमधुर आवाजात श्लोक गायले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समृध्दी कावेनी केले कार्यक्रमाचा परिचय व आभार प्रदर्शन साक्षी कवठकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *