महापारेषणच्या आंतरपरिमंडलीय क्रीडास्पर्धेचे कोल्हापुरात थाटात उद्घाटन

कोल्हापूर √ छत्रपती शिवाजी विद्यापीठात तीन दिवस चालणाऱ्या महापारेषणच्या आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे यांच्या हस्ते थाटात झाले.
यावेळी संचालक सुनिल सुर्यवंशी (प्रकल्प), रोहिदास मस्के कार्यकारी संचालक (संचलन), पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता संजीव भोळे, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता जयंत वीके, सांघिक कार्यालयातील मुख्य अभियंता सुनील शेरेकर, भूषण बल्लाळ, वाशी परिमंडलाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता श्रीमती शिल्पा कुंभार, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा मुख्य समन्वयक भरत पाटील, अधीक्षक अभियंता तथा क्रीडा सचिव प्रांजल कांबळे उपस्थित होते.
यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅंडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दीबळ, कुस्ती, ऍथलेटिक्स या स्पर्धा संपन्न होणार आहेत आठ परिमंडलातील सुमारे एक हजार अधिकारी व कर्मचारी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, चिदाप्पा कोळी, अशोक सागरे, संजय किंकर, राजेश केळवकर, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशांत चौधरी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

सांघिक भावना ठेवा – डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.)

आंतरपरिमंडलीय स्पर्धेमध्ये आठ संघांमध्ये सर्वोत्कृष्ट विजेतेपदासाठी चुरस अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये खेळाडूंनी सांघिक भावना ठेवून खिलाडीवृत्ती दाखवावी महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी चांगली कामगिरी करून स्पर्धेत नक्कीच चमकतील, असा विश्वास महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी कोल्हापुरात तीन दिवस चालणाऱ्या या आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *