‘एलबीपीएम’ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

” मतदान शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन “

सोलापूर √ सोलापुरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो यावर्षी ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ ही थीम देण्यात आली आहे. उपप्राचार्य देवराव मुंडे यांनी शपथ वाचन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते यावेळी डॉ. अनिल कांबळे, डॉ. विजय रेवजे, प्रा. भक्तराज जाधव, डॉ. आनंद शिंदे, प्रा. संतोष मारकवाड, प्रा. अमोल मोरे, श्याम साळुंखे, नियाज शेख आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *