स्वराजचे संस्थापक संभाजीराजेंचा वाढदिवस साजरा

सोलापूर √ महाराष्ट्रात नुकतेच स्थापना झालेल्या स्वराज्य पक्षाचे संस्थापक असलेले श्रीमंत संभाजीराजे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपतींना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री क्षेत्र बाळे खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आले याचबरोबर उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील गोपीनाथ आश्रम शाळेत खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, जिल्हा संघटक प्रदीप घागरे,उपशहर प्रमुख परमेश्वर (आबा) सावंत, उत्तर तालुका प्रमुख अमर रणपिसे, व्यापारी आघाडी प्रमुख विश्वास चव्हाण,धर्मराज भोसले, अक्षय नवगिरे, युवक शहर प्रमुख श्री इजाज हुंडेकरी,युवती प्रमुख कु अनुजा पाटील,शहर वकील संघ अध्यक्ष गणेश कदम, समाधान माने सौ भोसले मॅडम, सौ कादे मॅडम, सौ सावंत काकू आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *