श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाने केला मुर्तीकारांचा सन्मान

सोलापूर श्रीगणेश जयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंडळाच्यावतीने गणेशमुर्ती साकारणार्‍या १४ मुर्तीकारांचा शाल, श्रीफळ, फेटा व स्मृतीचिन्ह अशा स्वरूपात जिल्हा विशेष सरकारी विधिज्ञ अॕड. प्रदीपसिंग रजपुत, सोमपा अति.आयुक्त संदीप कारंजे,ज्येष्ठ विधिज्ञ अॕड.मिलिंद थोबडे, वैजिनाथ हत्तुरे सर, ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कसबा गणपती मंडळ आदर्शनिय व उपक्रमशील मंडळ असुन दुर्लक्षीत असलेल्या मुर्तीकारांचा सन्मान करुन सोलापुरातील सर्व मंडळांना आदर्शवत ठरणारे आहे अशा रीतीने मुर्तीकारांना प्रोत्साहनाचे कार्य करीत असल्याचे विचार सर्व मान्यवरांनी व्यक्त करत कसबा गणपती मंडळ राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले यावेळी मंडळाचे ट्रस्टी, विश्वस्त, सल्लागार, मार्गदर्शक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुधंती शेटे मॅडम यांनी केले तर आभार मंडळाचे उत्सव अध्यक्ष शशीकांत बिराजदार यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *