सोमपाचे माजी नगरसेवक चंदनशिवे व पुजारींनी “घड्याळ” घेतले बांधून…!

मुंबई √ सोमपागटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये सोलापूरात पक्ष संघटन मजबूत करणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा करून दुपारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमपा गटनेते आनंद चंदनशिवे , माजी नगरसेवक गणेश पुजारी , सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे तसेच चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व सदस्यांचे स्वागत करत गळ्यामध्ये पक्षाचा शाल घालून प्रवेश देण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर शहरासाठी प्राधान्याने लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

⬛ ⬛ ⬛ ⬛ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी नुकताच सोलापूरचा दौरा करून गेल्यापासून सोलापूर शहरातील राजकीय वातावरणाचे समीकरणे बदलत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.सोलापूरच्या पालकमंत्रीपदी भरणे मामा असतानाच घड्याळ बांधायची लगबग सुरू होती ती सोमपा गटनेते आनंद चंदनशिवे व माजी नगरसेवक गणेश पुजारी यांची परंतु आता अधिकृतपणे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत इंदापूरच्या भरणे मामांच्या माध्यमातून सोमपा गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत अखेर घड्याळ हातात बांधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *