परिवर्तन समूह संस्थेच्या वतीने ८ व ९ मार्च रोजी संस्कृती महोत्सव

महिला दिन महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर √ जागतिक महिला दिनानिमित्ताने परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. ८ व ९ मार्च रोजी सोलापुरातील सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात संस्कृती महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्था सचिवा अमृता अकलूजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेकडून दि. ८ मार्च रोजी चित्रकला, रांगोळी, गायन, वकृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. महाविद्यालयीन युवतीसाठी वयोगट १७ ते २५ याकरिता स्पर्धा आयोजित केले आहे तर ९ मार्च रोजी सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने मराठी महाराष्ट्रीयन संस्कृती महोत्सव पर्व आयोजित करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्रालय आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र मराठी संस्कृतीचा अमृत महोत्सव ही साजरा होत आहे. यासाठी युवक आणि युवती यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये लोकनृत्य स्पर्धा, सोलो नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा मराठी व महाराष्ट्र संस्थेची निगडित विषय देण्यात आले आहेत या स्पर्धा सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत होणार आहेत याचबरोबर विविध विषयांवर वकृत्व व चित्रकला स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
तसेच विविध नृत्य स्पर्धेत नृत्य स्पर्धा ग्रुप डान्स – लोकनृत्य मराठी गाणी, नृत्य स्पर्धा सोलो सादरीकरण – लोकगीत मराठी गाणी, वेशभूषा स्पर्धा – महाराष्ट्र संस्कृती दर्शन, गायन स्पर्धा – सुगम संगीत असणार आहे रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे विविध स्पर्धांसाठी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत असेही यावेळी अमृता अकलूजकर यांनी सांगितले.
 या पत्रकार परिषदेस अध्यक्ष नंदकुमार अकलूजकर, जगदीश बिडकर, स्नेहा शहाणे, राज लांबतुरे, बबीता दुपारगुडे, मनीष काटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *