जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचा ७ मार्च रोजी नारीशक्ती सन्मान …!

फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचा होणार बक्षीस वितरण सोहळा

सोलापूर √ श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो / रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा फाउंडेशनच्या वतीने दिनांक ७ मार्च रोजी सकाळी आकरा वाजता सोलापुरातील हॉटेल सूर्या इंटरनॅशनल भागवत थिएटर पाठीमागे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे आणि कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री सिद्धेश्वर महायात्रा काळातील धार्मिक विधी लहान मुलांचे बाराबंदी पोशाख स्पर्धा आणि महिलांचे पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सोलापूर शहरातील तब्बल २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सोमपाचेे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे परिवहन आयुक्त अर्चना गायकवाड, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, हृदयरोग तज्ञ डॉ.शैलेश पाटील, उद्योगपती राजेश मुगळे, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य किसन जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नाईक आदी उपस्थित राहणार असून या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ आणि नारीशक्ती सन्मान सोहळा सात मार्च रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल सूर्या या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास स्पर्धेचे विजेते आणि नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त महिला व सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद मुस्तारे यांनी यावेळी केले या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष रेवणसिद्ध बिज्जरगी, सचिव विकास कस्तुरे खजिनदार रवी बिद्री, सचिन शिवशक्ती, सौ.प्रिया बसवंती, विजय नवले, विशाल कल्याणी, गुरुशांत मोकाशी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *