‘ एल.बी.पी.एम ‘ महाविद्यालयात निरोप समारंभ संपन्न

 

सोलापूर √ समाजात काय चांगले ? काय वाईट ? काय योग्य ? काय अयोग्य ? काय करावे ? काय करू नये ? हे ठरविण्यासाठी आवश्यक असणारा आमच्यातील सदसद् विवेक महाविद्यालयाने जागविला विद्यार्थीदशेनंतर येणाऱ्या आव्हानदायी आयुष्याला यशस्वी सामोरे जाण्यासाठी ‘कणखर माणूस’ म्हणून उभे केले अशा भावना सोलापुरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या निरोप समारंभात विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे, डॉ. महादेव कोरी , डॉ.विजय रेवजे, डॉ.दशरथ रसाळ, डॉ.इंदुमती चोळळे यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्या पाटोळे, अर्चना गुडशेल्लू, राशद शेख, स्मिता गायकवाड, ज्ञानेश्वरी शिंदे, ऐश्वर्या सुरडे, करीना पाटील, ऋतुजा साळुंखे, विशाखा दनाने, लक्ष्मी कदम, स्नेहल जाधव आदी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, शिक्षणानंतर विद्यार्थीच समाजात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत असल्याने समाजाचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर महाविद्यालयाची प्रतिमा निश्चित होत असते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना नेहमी मानवता आणि सामाजिक बांधिलकी बाळगा विधायक दृष्टिकोन, सकारात्मक मानसिकता ठेवून स्व:अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करा असे आवाहन करून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अरुणा कोडम यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रा. संतोष मारकवाड यांनी मानलेज्ञयावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *