महावारुणी योग….

प्रतिनिधी √ महावारुणी योग अत्यंत महत्त्वाचा पुण्यप्रद योग शेकडो सूर्यग्रहण समकक्ष असलेले महावारुणी योगाचे अत्यंत महत्त्व स्कंद पुराण, नारद पुराण, भविष्यपुराण, श्रीमद् देवी भागवत महापुराण,धर्मसिंधु या सर्व महान ग्रंथांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्णन केलेल आहे. वारुणी योग हा पंचांगाचा सर्व अंगा मुळे बनत असतो. तीन प्रकारचा वारुणी योग असतो पहिला वारुणी योग, दुसरा महावारुणी योग, तिसरा महा महा वारुणी योग यांची महत्व वाढत जाते.
आपल्या भारतात दोन प्रकारचे पंचांग आहेत एक पंचांग आपल्या दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे ते म्हणजे अमांत पद्धतीचे म्हणजे अमावस्याला महिना समाप्त होणारे उत्तर भारतात पौर्णिमेला महिना समाप्त होतो. पण दोन्ही पंचांगांचा मध्ये या योगाचे महत्त्व अपरंपार आहे. दक्षिण भारतीय अमांत पद्धती पंचांगानुसार फाल्गुन मास कृष्णपक्ष त्रयोदशी तिथी आणि शततारका नक्षत्र असेल तर वारुणी योग होतो अशा महिना, पक्ष, तिथी, वार , नक्षत्राचा संयोगाने झालेल्या योग वर गंगास्नान करून जप तप नामस्मरण आणि इतर काही पुण्य कर्म केले तर त्याला शंभर सूर्यग्रहण मध्ये केलेल्या पुण्याएवढे पुण्य मिळते.

साधारण सोळा सतरा वर्षांपूर्वी असा महा वारुणी योग येऊन गेला आहे त्यावेळी साक्षात दत्तावतार श्री श्री श्री गणपती सच्चिदानंद जी स्वामी जी महाराज म्हैसूर यांनी गाणगापूरला येऊन विशेष स्नान केले होते. जे साक्षात दत्ताचे मूर्त स्वरूप आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा या योगाचे पालन होते. ६ एप्रिल २०२४ शनिवार ही तारीख हा वार अनेक वर्षानंतर येणाऱ्या महावारुणी पर्व संदर्भात आहे त्या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे आणि शनी प्रदोष चे महात्म्य श्री गुरुचरित्र या अत्यंत ज्वाजल्य ग्रंथात स्वतः श्रीदत्त गुरूंनी सांगितलेले आहे त्यामुळे ६ एप्रिल २०२४ शनिवारी गंगा स्नान झाले आणि पिंपळसेवा झाली तर फारच उत्तम पण तसे होत नसेल तर इतर कोणतीही महानदी जशी गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा अशा बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत तिथे करा, तिथे शक्य नसेल तर एखाद्या पवित्र तलावात , कुंडात जसे त्र्यंबकेश्र्वर ला सुद्धा स्नान करू शकता. तेही शक्य नसेल तर घरीच स्नान च पाण्यात गंगाजल मिसळून किंवा नर्मदा जल मिसळून स्नान करताना भगवती गंगेचे भरपूर स्मरण करत तीर्थात करतात तसेच सवस्त्र स्नान करावे.
नित्य आणि नैमित्तिक कर्म कालांतराने फळ देतात. काम्य कर्म जर अगदी अचूक केलं तर तत्काळ फळ मिळत. तुम्ही या महावारुनी योगा वरती मनात कामनिक संकल्प ठेवून जरी एखादी सेवा केली तरी ती तात्काळ फळ देईल पण त्यासाठी ती सेवा अगदी बिनचूक व्हायला हवी. वरूण देवतेची पूजा आहे वरूण देव हेच संपत्ती आणि संतती देणारे आहेत. समुद्रमंथन मधून वारुणी पण निघाली होती तिला वरूण देवाची शक्ती पण म्हणले जाते ही पूजा प्रामुख्याने त्या शक्तीची पूजा आहे.
६ एप्रिल २०२४ शनिवारी सकाळी १० वाजून २० मिनिटानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ होते आणि शततारका नक्षत्र १५:४० म्हणजे दुपारी तीन चाळीस पर्यंत आहे हा पाच तास वीस मिनिटांचा कालावधी अत्यंत पुण्यप्रद आहे. या पाच तास वीस मिनिटात महानदी स्नान, जप तप करावे. महावारुणी योग आणि महा महा वारुणी योग मध्ये सादू ,संत, कर्मकांड करणारे पुरोहित गुरुजी आणि ज्योतिषी यांनी महावारुणी योग उपासना जप तप जप्कारातात आणि केल्यामुळे दैवी सिद्धी प्राप्त होतो आणि मनोकामना पूर्ण होतो.
विवाह जुळत नसलेल्या वर कन्येच विवाह व्हावे म्हणून यथासांग शिवपूजन केले तर नक्कीच शिवकृपेने खूप लवकर विवाह जुळतात. संतान सौख्य प्राप्त होतो तरी
या महावारुणी योगांच सर्वांनी लाभ घ्यावे .

साभार लेखन – भरत नाबारीया
शब्दांकन – वेदमूर्ती श्री ईश्वर स्वामी होळीमठ सोलापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *