विविध अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मोरारी बापूंची श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना मदत

 

मेट्रो सोलापूर √ गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला या मृतांच्या कुटुंबीयांना रामकथा श्रोते परिवाराच्या वतीने १ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

सौराष्ट्रात सिहोर तालुक्यात नदीत बुडून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आदरणीय श्री मोरारीबापू यांच्या वतीने स्थानिक पत्रकार श्री मुकेशभाई पंडित यांच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ हजार रुपयांची मदत पाठवली जाईल. याशिवाय मोरबीजवळील खरचिया गावात एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला असून दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना मोरबीच्या लजई गावातील रामकथा श्रोत्यांनी ३० हजार रुपयांची मदत दिली आहे. सावरकुंडला तालुक्यातील लुवरा येथे सिंहीणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या कुटुंबाला १५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे अशा प्रकारे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची मदत केली आहे. पूज्य मोरारीबापूंनी विविध घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *