श्री सिद्धेश्वर प्रशालेतील १९९८ बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

सोलापूर √ सोलापुरातील श्री सिद्धेश्वर प्रशालेतील १९९८ बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा २५ वर्षानंतर सर्व जुने मित्र एकत्र येऊन श्री सिद्धेश्वर प्रशालेत जाऊन तेथे जुन्या आठवणींना उजाळा दिला व या बॅचमधील विद्यार्थी राघवेंद्र जामगुंडी यांनी आपला हॉल स्नेह मेळाव्यास उपलब्ध करून दिले. या स्नेह मेळाव्यात प्रथम जामगुंडी मंगल कार्यालय येथे श्री सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व गुरुवर्यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आले यावेळी सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटील सर उपमुख्याध्यापक उंबरजे सर पर्यवेक्षक बिराजदार सर व माजी मुख्याध्यापक वाडकर सर माजी मुख्याध्यापक उकरडे सर माजी मुख्याध्यापिका सौ पुराणिक मॅडम व नश्टे सर उपस्थित होते.

या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज शासकीय निमशासकीय तसेच व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याने शिक्षकवृंदानी आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

माजी विद्यार्थी ग्रुप प्रमुख सागर झाड, राघवेंद्र जामगुंडी, रोहन मुदगल, उमेश मल्लापुरे, गणेश पटणे,शिवानंद सावळगी, अरविंद महाले आदींनी विशेष परिश्रम घेतले मंगेश अकतनाळ व करमाळकर यांनी सूत्रसंचालन केले शाळा सोडून तब्बल पंचवीस वर्षांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन कौटुंबिक वातावरणात स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *