भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी, प्रणिती शिंदेंचा खोचक टोला

 

मेट्रो सोलापूर √ सोलापूरातील आकाशात विमान घिरट्या घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत, अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती शिंदे शनिवारी सोलापूर लोकसभा क्षेत्रातील अक्कलकोट तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात प्रणिती यांनी, भाजपवर टीकेची झोड उठवली. 

बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न, दुधाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले. प्रणिती यांनी सांगवी, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळ्ळी, बोरगाव, घोळसगाव, साफळा, समर्थनगर, कडबगाव, नावदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या. वागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले. 

या प्रसंगी माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अशपाकभाई बळोरगी, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, काँग्रेस महिला ता.अध्यक्षा शितलताई म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शहर अध्यक्ष रईस टीनवाला, शिवसेनेचे आनंद बुक्काणूरे, राष्ट्रवादीचे बंदेनवाज कोरबू, संचालक इरण्णा धसाडे, सिद्धार्थ गायकवाड, सायबु गायकवाड, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला, माजी सरपंच रवि वरनाळे, उद्योजक राजकुमार निरोळी, बाजीराव खरात,सिद्धु कोळी, रवी पोमाजी, धानपा आळंद, शकील शेख, अरुण जाधव, अशोक बंदीचोडे, काशिनाथ कुंभार, सुनिल कोळी, संतोष मडिवाळ आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *