गोल्डन मेंबर श्रीदेवी फुलारेंनी “फाटकी साडी” घालून अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

सोलापूर √ काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक पध्दतीने अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे या सोमवारी अंगावर फाटकी साडी घालून आल्या होत्या त्यांना पाहताच माध्यमाने आपल्या कॅमेरा मध्ये टिपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मिरवणूक न करता मी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायला आले आहे. कारण सोलापूरच्या विकासाची अवस्था आज फाटकी झाली आहे, सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, शेतकरी, कामगार, तरुण यांचे प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *