‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात मतदार जागृकता आणि सहभाग कार्यक्रम

नवमतदारांची ‘मी मतदान करणारच’ शपथ ग्रहण आणि स्वाक्षरी मोहीम

सोलापूर √ सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नवमतदार विद्यार्थिनींनी ‘मी मतदान करणारच’ अशी शपथ ग्रहण करून स्वाक्षरी मोहिमेतही सहभाग नोंदविला.

भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि निर्वाचक सहभाग कार्यक्रम’ (स्वीप) या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा या हेतूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे यांनी शपथ वाचन केले यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ अनिल कांबळे, प्रा. संतोष मारकवाड, प्रा.शशांक बिराजदार, प्रा.अमोल मोरे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *