आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी – भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव

 

 

               

                तीन मतदारसंघांची बैठक संपन्न

मेट्रो सोलापूर √ आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी युवकांची पर्यायाने भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी राहील. त्यामुळे भाजपच्या विजयासाठी भाजयुमोने तयारीला लागावे, असे आवाहन भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव व सहप्रभारी अनिकेत हरपुडे यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोलापूर प्रभारी ललिता जाधव, सहप्रभारी अनिकेत हरपुडे, भाजयुमो शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर शहर उत्तर विधानसभेची बैठक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात, दक्षिण सोलापूर विधानसभेची बैठक आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालय येथे तर शहर मध्य विधानसभा मतदार संघाची बैठक भाजप कार्यालयात झाली.

ललिता जाधव म्हणाल्या, लोकसभा निवडणूकीत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांची नावे नोंदवून घ्यावीत. नवमतदार नोंदणी करावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची शिबिरे भरवून महिला भगिनींना लाभ मिळवून द्यावा. तसेच महायुती सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख म्हणाले, युवकच देशाचे भविष्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विजयात भाजयुमोची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सूचनेप्रमाणे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचून पक्षाची ध्येयधोरणे राबवावीत.

याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश सचिव गणेश साखरे, सरचिटणीस सिद्धार्थ मंजेली, पंकज काटकर, महेश देवकर, उपाध्यक्ष अजित गादेकर, नागेश येळमेली, शिवराज झुंजे, रोहित हंचाटे, नरेंद्र पिसे, दीपक जाधव, समर्थ होटकर, प्रेम भोगडे, भार्गव बच्चु, हरिप्रसाद बंडेवार, पवन आलुरे, राहुल घोडके, निलेश चिलवेरी, राजू अचुगटला, अनिल अंजनाळकर, रोहन मराठे, ओंकार होमकर, शांतेश स्वामी आदीसह युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *