स्केटिंगपटूची असित कांबळेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

मेट्रो सोलापूर √ बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेमध्ये सोलापूरातील विनर्स फाऊंडेशनचा खेळाडू असित कांबळे या स्केटिंगपटूची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. सलग ७५ तास रिलेमध्ये १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग युजिंग टू व्हील्स अंतर १४.८४ सेकंदात पूर्ण केले.

शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे बेळगाव येथे २८ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत २०० मीटरच्या स्केटिंग ट्रॅकवर सलग ७५ तास रिले १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग युजिंग टू व्हील्सची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी करण्यात आली. देशभरातून ३९५ खेळाडू यावेळी सहभागी झाले होते विनर्स फाऊंडेशनचा खेळाडू असित कांबळे या स्केटिंगपटूने सहभागी इतर खेळाडूंसोबत १०० मीटर अंतर १४.८४ सेकंदात पार करून हे वर्ल्ड रेकॉर्ड केले. असितला बेळगावच्या पोलीस उपायुक्त स्नेहा पी व्ही यांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. असित कांबळे या खेळाडूला प्रशिक्षक सम्यक मोहोळकर, ऋषिकेश तारडे, सागर राठोड तसेच शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबचे अध्यक्ष ज्योती चिंडक, रेकॉर्डचे प्रशिक्षक निखील चिंडक, यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल नागरिकांतून असितचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *