स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव १ ऑगस्ट पासून नागरिकांसाठी खुले

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज स्मार्ट सिटी अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे भेट देऊन पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली.सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे जलतरण तलाव नागरिकांसाठी एक ऑगस्ट रोजी सुरु करण्यात येईल अशी माहिती सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली. तसेच यावेळी आयुक्तांनी पार्क स्टेडियम,कबड्डीचे मैदान, खो-खोचे मैदान,हॉली बॉल मैदान, जिमखाना, स्कॉच कोर्ट येथील पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, क्रीडा अधिकारी मुर्तूजा शाहापुरे, रेवणसिद्ध कलशेट्टी आदी सोमपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *