उजनी धरणात येणारा विसर्ग होत आहे कमी… गतवर्षी तुलनेत परिस्थिती चिंताजनक

सोलापूर : राज्यात यावर्षी आजमितीस सरासरी समाधानकारक पाऊस पडला असल्याने शेतकरी बांधव आपल्या कामात मग्न आहेत ते पुढील पावसाच्या भरवशावर ,सध्यस्थितीत उजनी धरणातील पाणी साठा हा गतवर्षी ऑगस्ट महिन्यात असलेल्या पाणी साठ्याच्या तुलनेत यावर्षी मात्र उजनी धरण मायनस मध्येच आहे , सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या यशवंत जलाशयाची (उजनी धरण) गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठ्याची सद्यस्थितील परिस्थिती ही चिंताजनकच दिसून येते मागील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उजनी धरण हे १०५.५९ % टक्के क्षमतेने भरलेले होते व यातील उपयुक्त पाणीसाठा ५६.५७ टीएमसी एवढा मुबलक प्रमाणात होता परंतु यावर्षी १४ ऑगस्ट २०२३ रोजीपर्यंत केवळ १३.२२ % टक्केच पाणीसाठा आहे व उपयुक्त पाणीसाठा ७.०८ % टक्के टीएमसी एवढा उपलब्ध असल्याने


उजनीतून बोगद्याद्वारे ,सिना माढा उपसा ,भिमा नदी
दहीगाव उपसा ,मुख्य कालवा तसेच वीज निर्मितीसाठी सोडला जाणारा विसर्ग हा कोरडा ठणठणाटच आहे.
पुणे व सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे उजनी धरणात दौंडवरून ७५१ क्यूसेक्स अशा संथगतीने येणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणातील पाणीसाठा सद्यस्थितीला चिंताजनक परिस्थितीत दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *