पोलीस आयुक्तालयात दुचाकीस्वारांना विना हेल्मेट प्रवेश निषेध…!

सोलापूर : सोलापूर दक्षिण शहर वाहतुक पोलीस नियंत्रण शाखेने सोलापूर पोलीस आयुक्तालयात प्रवेश करताना दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट बंधनकारक असल्याचा ( No Entry Without Helmet ) फलक लावलेला असून त्याची अंमलबजावणी ही कठोर केली जात असल्याचे चित्र आज पोलीस आयुक्तालय समोर दिसून येत होते दुचाकीचालक विना हेल्मेट पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश करणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना ही पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात येत आहे , वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस दुसऱ्या हेल्मेट रहित वाहन चालक पोलीस कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करत असल्याचे यावेळी निदर्शनास आले या ठिकाणी कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस कर्मचारी सुनील काळे हे आयुक्तालय समोर नेमणूक दरम्यान येथील वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या सुमारे दहा हून अधिक दुचाकीस्वारांना ( पोलीस कर्मचाऱ्यासह ) दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांना समज देऊन सोडले जात असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *