महापारेषणच्या प्रकाशगंगा या मुख्यालयात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे अनावरण

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) मुंबईत मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी थाटात करण्यात आले.
जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय, भारतीय संविधानाचा विजय असो… अशा घोषणा देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली होती.भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा, संविधानाविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणीव जागृती व्हावी, देशात एकात्मता, समता व बंधुता रूजावी, यासाठी महापारेषणच्या क्षेत्रीय कार्यालयातही भारतीय संविधानाची प्रास्ताविका बसविण्यात येणार असल्याचे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.


याप्रसंगी महापारेषणचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त) अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, कार्यकारी संचालक (संचलन) रोहिदास मस्के, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) संतोष आंबेरकर, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) कैलास कणसे, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडे, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) नागसेन वानखेडे, मुख्य अभियंता पीयूष शर्मा,भूषण बल्लाळ यांचेसह विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *