नागपंचमीनिमित्त परदेशी कुटुंबाकडून महाप्रसादाचे अविरतपणे वाटप सुरू

सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील जुना पुना नाक्याजवळील मडकी वस्ती येथील प्रसिद्ध श्री नागनाथ महाराज मंदिराची स्थापना 1983 साली इंद्रश्री मोटर्स चे संचालक नागनाथांचे निस्सीम भक्त मुन्नीलाल श्रीपाल परदेशीं यांनी जुना पुणे महामार्गावर मोठ्या भक्ती भावाने श्री नागनाथाची प्राणप्रतिष्ठापना केली .
येथील नागनाथ मंदिरात आजही गेल्या 40 वर्षांपासून परदेशी कुटुंबाकडून नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो तसेच अविरतपणे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसह परिसरातील भक्तांना शिरा प्रसाद वाटप केले जाते पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणामध्येही या मंदिराचे सुदैवाने काही नुकसान झाले नाही व आज हे मंदिर रस्त्याच्या मध्यभागी आले आहे सदर रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊ नये यामुळे येथे आता महाप्रसादाचे वाटप हे मर्यादित असे 51 किलोचे करण्यात आले असल्याचे मुन्नीलाल परदेशी यांनी सांगितले.
यावेळी गौतम श्रीपाल परदेशीं, अनिरुद्ध मुन्नीलाल परदेशीं ,रोहित गौतम परदेशीं व इंद्रश्रीचे कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *