चिंचोळी एमआयडीसी परिसरात युवकावर अज्ञात कारणामुळे प्राणघातक हल्ला

सोलापूर : अज्ञात कारणाने सिद्धाराम शिवानंद जामगोंडी वय 27 रा. वाणी गल्ली, बार्शी रोड बाळे सोलापूर या युवकांवर गंभीर प्राणघातक हल्ला २३ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास चिंचोळी एमआयडीसी परिसरात सदर घटना घडली आहे उपचारासाठी दत्तात्रय विभुते यानी शासकीय रुग्णालयात दाखल केले .
जखमी सिध्दाराम हा चिंचोळी एमआयडीसीतील पारले कंपनीत काम करत असून, पारले बिस्किट कंपनीतील कामगाराकडून अज्ञात कारणावरून लाथा – बुक्याने दगडाने मारहाण केल्याने डोक्यावर गंभीर स्वरूपात इजा झाल्या आहेत हल्ला करणाऱ्यांची नावे व कारण अजून निष्पन्न झाले नसून सदर घटनेची नोंद सिव्हील चौकीत झाली असून जखमी युवकास पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *