” एमआयटी ” शिक्षणसंस्था समूहाच्या विश्वप्रयाग विद्यापीठाचा सोलापूरात शुभारंभ !

वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसह महाविद्यालय
१८ सप्टेंबरपासून सुरू

सोलापूर : विश्वविख्यात माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ वा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली ४० वर्ष मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरूण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाअंतर्गत चार विद्यापीठे विश्वराजबाग, पुणे येथे ‘एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे येथे डॉ विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’, उज्जैन, मध्यप्रदेश येथे ‘अवंतिका युनिव्हर्सिटी’ आणि शिलाँग, मेघालय येथे ‘एमआयटी तंत्रज्ञान विद्यापीठ’ कार्यरत आहे त्याचबरोबर वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, नौका अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माण, शिक्षणशास्त्र, कला, वाणिज्य, विज्ञान व संशोधन कायदा,डिझाईन स्कूल ऑफ गव्हर्नमेंट गुरुकूल, विश्वशांती संगीत कला अकादमी, सीबीएसी माध्यम प्रशाला अशा विविध शैक्षणिक शाखांच्या ६३ संस्थामधून सुमारे ६४,००० विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेत आहेत. शिक्षण व संशोधन हा केंद्रबिंदू मानून शास्त्रोक्त समृद्ध आणि उद्दिष्टपूर्ण शिक्षण देणे, हे या संस्थेचे ध्येय आहे ज्ञानदानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी खेड्यापाड्यापर्यंत ज्ञानाची दारे खुली व्हावीत अशा उदात्त हेतूने भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानावर आधारित आणि भारतीय गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या संस्थेने गेल्या चार तपाच्या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन इत्यादी क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे.

माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या विश्वशांतीच्या अद्वितीय कार्याची दखल घेत पुण्याच्या ‘माईर्स एमआयटीच्या विवशांती केंद्रास, ‘युनेस्को, पॅरिस तर्फे मानवी हक्क, लोकशाही, सहिष्णुता आणि विश्वशांतीच्या कार्यासाठी ‘युनेस्को अध्यासन मिळाले आहे. अशा प्रकारचे हे भारतातील पहिले आणि दक्षिण आशियातील दुसरे अध्यासन आहे. विश्वशांती केंद्राद्वारे वैधिक शिक्षणपद्धतीतून सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा व विज्ञानातून समाजविकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.शिक्षण क्षेत्रातील ४० हून अधिक वर्षांची परंपरा पुढे घेऊन जात माईर्सने शिक्षण समूहाच्या माध्यमातून सोलापूर येथे एमआयटी विश्वप्रयाग विश्वविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेनुसार सुरू होणार आहे.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कायदा, व्यवस्थापन,टेक्स्टाईल डिझाइन, ह्युमँनिटीज अशा अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या जगात आपण सर्वजण अनुभवत असलेला सर्व प्रकारचा नैसर्गिक, सामाजिक असमतोल दूर करण्याकरिता विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाला भारतीय ज्ञान – विज्ञान – सांस्कृतिक अभ्यास पद्धतीचा आधारभूत शिक्षण अर्थात भारतीय ज्ञान पद्धतीने देण्याचा या विद्यापीठाचा मानस आहे.शिक्षणाचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यगुणांचा विकास करणे हा असून, उपलब्ध ज्ञानाचे विश्लेषण करून ते समाजोपयोगी होण्याची शिक्षण प्रणाली येथील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. जेणेकरून विश्वप्रयाग विद्यापीठातून ज्ञानार्जन करून बाहेर पडणारा विद्यार्थी हा स्वयंशिस्तीचे अवलंब करणारा समाज व देशाच्या प्रगतीमध्ये सक्रियपणे सहभागी होणारा एक सुजाण नागरिक असेल जो भारत देशाचे महासत्ता बनण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक तर असेलच परंतु संपूर्ण जगभर देखील आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व उत्कृष्ट पद्धतीने करू शकेल.
महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून या विद्यापीठात निर्माण करण्यात आलेली आहे. सोलापूर परिसरातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान (आयटी) इन्फ्रास्टक्चर असलेली सुसज्ज सव्वादोन लक्ष स्केअर फुटाची इमारत सोलापूर पुणे महामार्गावरील केगाव येथे विश्वप्रयाग विद्यापीठात उभारलेली आहे पुढील काही दिवसात अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती माईर्स एमआयटी, पुणे शिक्षण समूहाच्या महासचिव आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्ष प्रा. सौ. स्वाती म. चाटे यांनी दिली यावेळी डॉ गोपालकृष्ण जोशी सौ.प्रभा कासलीवाल एचआर सिंग मैडम जनसंपर्क अधिकारी कुंभार सर सह आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *