देशातील पश्चिम विभागात ” सोलापूर स्मार्टच सिटी ” सोलापूरला मिळाले पारितोषिक

महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

सोलापूर : स्मार्ट सिटी मिशन चे प्रकल्प संचालक कुणाल कुमार यांनी इंडिया स्मार्टसिटी अवॉर्ड कॉन्टॅक्स 2022 च्या विजेत्यांची घोषणा दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी केली यामध्ये सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील कामांच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या पश्चिम विभागातील पारितोषिक घोषित करण्यात आले या पारितोषिक सोहळ्याचे वितरण दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते इंदोर येथे पुरस्कार वितरण होणार आहे .

पश्चिम विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दहा लाखाहून कमी सोलापूर शहर व अहमदाबाद स्मार्ट सिटी दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांसाठी पारितोषिक घोषित झाले आहे. देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी इंदोर, सुरत आणि आग्रा या शहरांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक घोषित करण्यात आले. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोलापूर शहरामध्ये पाणी नियोजनासाठी स्काडा प्रणाली, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागांचा विकास, सौरऊर्जा प्रकल्प, रस्ते विकास, पाण्याच्या पाईपलाईन बदलणे तसेच मैला पाण्याच्या पाइपलाइन बदलणे, सोमपा इंद्रभवन इमारत आणि लक्ष्मी मंडई येथील इमारत अशा पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात आले होते उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम देखील स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबविण्यात येत असून काम प्रगती पथावर आहे सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या एकूण 47 प्रकल्पांपैकी 43 प्रकल्प पूर्ण झाले असून यापैकी चाळीस प्रकल्प महापालिकेस हस्तांतरित केले आहेत अशी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारताच्या पश्चिम विभागात सोलापूर शहराला पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *