विद्यार्थी साकारणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती…

सोमपा माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व श्री गणेशयुग सोलापूर आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या मोफत कार्यशाळचे आयोजन दिनांक 11 सप्टेंबर 2023 सकाळी 9.00 ते 12 .00 रोजी सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल शेजारी असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियम याठिकाणी करण्यात आलेले आहे. सोलापूर महानगरपालिका व श्री गणेशयुग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात येत असून या कार्यशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिंनीना श्री गणेशयुग सोलापूर चे संस्थापक पर्यावरण प्रेमी विकास गोसावी हे गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्व साहित्य सोमपाकडून मोफत दिले जाणार असून कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

■ सोलापूरातील शाळांना सोमपाचे आवाहन ■

सोलापूर शहरातील प्रत्येक शाळांमधील इयत्ता 5 वी ते 12 वी ह्या वर्गातील एकूण 10 विद्यार्थी ( 5 विद्यार्थीनी 5 विद्यार्थी व एक कला शिक्षक ) ह्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेसाठी सहभाग नोंदवावा तसेच या कार्यशाळेत हाताने बनवलेल्या श्री गणेशाची मूर्ती आपापल्या घरात प्रतिष्ठापना करावी असे आवाहन आयुक्ता शीतल तेली – उगले यांनी केले आहे.

टीप :
१) ही कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांना मोफत आहे .
२) यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
3) कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य ( माती ) सोमपाकडून उपलब्ध करून दिली जाईल.
4) येताना सर्व विद्यार्थ्यांनी हात पुसण्यासाठी नॅपकिन, पाण्याचा मग, वॉटर बॉटल घेऊन यावे.
5) प्रत्येक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिलेल्या नंबर वर एक्सेल (Excel) स्वरुपात पाठवावेत

अधिक माहिती संपर्क : –
श्री स्वप्नील सोलनकर – 9657421081
श्री विकास गोसावी – 9822660121

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *