रिटायर्ड एसीपी बनले विधीचे विद्यार्थी…!

सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयातून सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून गेल्या महिन्यातच निवृत्त झालेले मनमिळावू कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिपक आर्वे यांनी नुकतीच सीईटी परीक्षा देऊन मेरिटमध्ये 150 पैकी 103 गुण मिळवून नववा क्रमांक पटकावत सोलापूरातील नामवंत दयानंद विधी महाविद्यालयात ( Law College ) प्रवेश घेऊन आयुष्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये बनले विद्यार्थी व शिक्षण शिकायला वयाचे व पदाचे बंधन नसते असा आदर्शनिय सकारात्मक संदेश युवकांसह समाजासमोर ठेवला आहे विशेष बाब म्हणजे आर्वे साहेब हे तीन वर्षे रेग्युलर कॉलेज करून विधीची डिग्री मिळवून भविष्यात सद्भावनेतून समाजातील गरजू ,गरीब ,पिडीत लोकांसाठी वकिली ही मोफत करणार असल्याचे सांगितले.


अशा असामान्य अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *