शिरुर व पटणे यावर्षीचे तपोरत्नं गुणवंत पुरस्काराचे मानकरी

सोलापूर : सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यंदाचा सहावा तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवकुमार शिरुर यांना तर तपोरत्नं गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रशांत पटणे यांना जाहीर झाला आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथील तपोरत्नं सभागृहात आयोजित कार्यक्रमात तपोरत्नं गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र,शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून शिरुर व पटणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.यावर्षी सेवानिवृत्त झालेले दयानंद महाविद्यालयाचे प्रा.विजयकुमार बिराजदार, मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापिका रत्नमाला उकरंडे, ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, ज्येष्ठ लिपिक राजशेखर स्वामी आदींचा तसेच प्राचार्य डॉ.राजशेखर हिरेमठ यांना सोलापूर विद्यापीठाचे आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदींच्या निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कार कर्त्यांची निवड केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *