लालपरी पर्यावरणपूरक नव्या ई – शिवाईE स्वरूपात सोलापूर आगारात दाखल

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारामध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज वातानुकूलित पर्यावरणपूरक पाच शिवाई इलेक्ट्रिक एसटीबसेस दाखल झाले आहेत यापैकी एका ई – शिवाई एसटी बसची महापूजा श्रीक्षेत्र खंडोबा बाळे येथे पूजन सामाजिक कार्यकर्ते मारुती तोडकरी, विश्वनाथ पाटील, निवृत्त एसटी कर्मचारी भगवान जोशी नागनाथ क्षीरसागर ,शेखर जोशी, भैय्या जोशी व महिला भगिनी यांच्या उपस्थित करून बस मार्गस्थ करण्यात आले.२३ सप्टेंबर पासून सोलापूरात ई -बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे सदर ई – एसटी बसमध्ये महिला सन्मान योजना , ज्येष्ठ नागरिक अमृत योजना अशा शासनाचे सर्व लाभार्थी प्रवासी प्रवास करू शकणार आहेत यावेळी सोलापूर बसस्थानक प्रमुख विकास पोफळे वाहतूक नियंत्रक संतोष जोशी, नागेश रामपुरे ,संजय जमादार ,भंडारेसह नागरिक उपस्थित होते.

प्रवाशांसाठी आरामदायी ई – शिवाईE बस

सोलापूर आगारात पाच शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत या वातानुकूलित तसेच ध्वनी व प्रदूषणविरहित आधुनिक डिझाइनयुक्त ई – शिवाई एसटीबसमध्ये एकूण ४३ प्रवासी आरामदायी प्रवास करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *