३० सप्टेंबरला नेटबॉलची होणार निवड चाचणी

सोलापूर : पुढील महिन्यात ६ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान नंदूरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील मुला – मुलीचीं निवड चाचणी शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सोलापूरातील रंगभवन येथील रॉर्जस इंग्लिश मिडिअम स्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार असून सदर राज्य स्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी अनुक्रमे १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात येणार आहे.तरी राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव खुदूस यांनी केले असून अधिक माहितीसाठी ( विठ्ठल कुंभार सर ) ९४२३५२६०७१ या नंबरवर संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *