श्री गणेशोत्सवातून सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावे – प्रा. बगले

सोलापूर : आधुनिक काळात गणेशोत्सव पुर्वी पेक्षा जोरात साजरे होत आहेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून जनजागृती निर्माण करून सामाजिक ऐक्याची भावना वाढवली,पुर्वीची सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक पुरुषोत्तम बगले यांनी केले.
सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात गणेशोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत बगले सर बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते.
प्रा.बगले पुढे म्हणाले,दहा दिवसांच्या गणेशोत्सवात पूजाअर्चा विधी बरोबरच सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणे आवश्यक आहे कीर्तन , प्रवचन, पोवाडे, व्याख्यानमालेतून जनजागृती होणे काळाची गरज आहे. सजावट, विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणूक खर्चाला फाटा देऊन संगीत, नृत्य, भावगीत ,जादू,नकला अशा प्रबोधन कार्यक्रमातून समाजहित साधून समाजाचा विचार व्हावा असे प्रतिपादन बगले सरांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,प्रा.लक्ष्मी कुरापाटी, विजयालक्ष्मी माळवदकर आदी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *