” बाप्पाला ” निरोप देण्यासाठी सोमपा प्रशासन सुसज्ज…

सोलापूर : श्री गणरायाच्या विसर्जन करिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात श्री गणेश विसर्जना संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त, आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.सोमपाच्या वतीने श्रींच्या विसर्जनाकरिता सोलापूरात 12 विसर्जन कुंडासह विविध 83 ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात आले आहेत. तुळजापूर रोड हिप्परगा येथील खाण, विष्णू घाट,गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील म्हाडा विहीर आदी विसर्जन कुंड.
श्रींच्या विसर्जनासाठी सोमपाने तयारी पूर्ण केली असून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांचे फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर श्री ची मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी 86 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून या विसर्जनासाठी तब्बल 1552 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे. विसर्जनापूर्वी राहिलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात सोमपाचे अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *