वन्यजीव सप्ताहाची पक्षीनिरीक्षणाने होणार सुरुवात

सोलापूर : सोलापूर वनविभाग सोलापूर व वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी स. 6 वाजता सोलापूरातील श्री सिध्देश्वर वन विहार येथे वन्यजीव सप्ताह उदघाटन, पक्षी निरीक्षण उपक्रम व स्पॉट फोटोग्राफीचे आयोजन करण्यात आले आहे. यात पक्षी, प्राणी, कीटक व फुलपाखरू इत्यादींचे रंग, आकार, पक्ष्यांच्या पंखांची ठेवण चोच आदी गोष्टींची निरीक्षणाद्वारे माहिती देण्यात येणार आहे. तरी सोलापूर शहर व परिसरातील सर्व स्वयंसेवी संस्था (NGO), निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमीनी या उपक्रमात सहभागी होऊन वन्यजीव सप्ताह साजरा करावा असे आवाहन सोलापूर वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

◆ विशेष आवाहन ◆

■ निरीक्षणावेळी भडक रंगाचे कपडे परिधान करू नये.
■ येताना आपल्या वाहनाने अथवा स्वखर्चाने आपापल्या जबाबदारीवर येणे.
■ या परिसरातील निसर्ग, जैवविविधतेला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
■ आपण निरीक्षणावेळी काय काय पाहिले त्याची नोंदी करण्यासाठी सोबत वही पेन घेऊन येणे.
■ प्रवेश निशुल्क.

टीप : दि. 1 ऑक्टो. 2023 रोजी एक तास विशेष स्वछतेसाठी श्रमदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *