प्रणिता कांबळे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्काराने होणार सन्मान

सोलापूर : नागपूरात ३० सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या संमेलनात मराठी साहित्य मंडळ ह्या प्रख्यात संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यावर्षीचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार सोलापूर बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना जाहीर झाला आहे.या करिता विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याकरिता आवाहन करण्यात आले होते प्रस्तुत प्रस्तावामधून तज्ञ निवड समितीने प्रणिता कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार जाहीर केला आहे प्रणिता कांबळे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली असून ६ राज्यस्तरीय पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत सोलापूरकरांसाठी ही गोष्ट अभिमानास्पद आहे प्राप्त पुरस्काराबद्दल प्रणिता कांबळे यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *