४ व ५ ऑक्टोबर रोजी पाण्याचा शटडाऊन

नागरिकांनो पाणी काटकसरीने वापरा – सोमपा

सोलापूर : सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणा-या टाकळी ते सोलापूर मेन पाईपलाईनला एस.आर.पी कैंप येथे मोठ्याप्रमाणात गळती होत असून सदरची गळती बंद करणे करीता बुधवार दि.०४.१०.२०२३ रोजी शटडाऊन घेणेत येणार आहे तसेच भवानीपेठ जलशुध्दिकरण केंद्राला वीज पुरवठा करणा-या म.रा.वि.वि.कंपनीकडून देखभाल दुरुस्ती कामा करीता विद्युत पुरवठा दि.०४.१०.२०२३ रोजी खंडीत होणार असल्याने भवानीपेठ येथून पाण्याचा उपसा पुरेश्याप्रमाणात होणार नाही.
उपरोक्त टाकळी पंप हाऊस व भवानी पेठ पंप हाऊस या दोन्ही ठिकाणाहून शटडाऊन कालावधीत पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होणार नसल्याने सोलापूर शहरात दि.०४ व ०५ ऑक्टोबर रोजीचा पाणी पुरवठा उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे तरी सोलापूरातील नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन सहकार्य करावे असे आवाहन सोमपा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *