लोकमंगल दांडिया स्पर्धेला महिला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिरकणी ग्रुपने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

सोलापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त लोकमंगल समूहाच्यावतीने आयोजित दांडिया उत्सवात युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जुळे सोलापूर येथे आयोजित या दांडिया स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षिसांची लय लूट करण्यात आली.
लोकमंगल समूहाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच शनिवारी जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स ग्राउंडवर दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील युवतींमध्ये उत्साह संचारला होता. नॉनस्टॉप म्युझिक लाईट, डीजे व फटाक्यांची आतिषबाजीसह लेझर शोने तर या स्पर्धेत आणखी रंगत आणली
पारंपारिक वेशभूषेत महिला व युवक- युवतींनी ग्रुप दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. .
स्पर्धेत दांडिया , गरबासाठी सोलो डूएट दांडिया , जनरल दांडिया असे गट होते. ग्रूप गरबामध्ये अनुक्रमे हिरकणी ग्रुपला प्रथम क्रमांकाचे 21 हजारांचे पारितोषिक , नृत्यकला ग्रुपला द्वितीय क्रमांकाचे 15000 तर रेणुका माता ग्रुपला तृतीय क्रमांकाचे 11 हजारांची पारितोषिक आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर बेस्ट ड्रेस व बेस्ट फॅमिली परफॉर्मन्स, बेस्ट सोलो डान्स सह विविध प्रकारात मिळून सुमारे दीड लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली याशिवाय वस्तू स्वरूपातही महिलांना बक्षीस देण्यात आली.
कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह प्रादेशिक पर्यटन उपसंचालिका शमा पवार, वैद्यकीय अधिकारी आग्रजा चिटणीस, विशाला दिवाणजी, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, सोलापूर विद्यापीठ कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे, मनीष देशमुख, स्मिता देशमुख, अवंती देशमुख, स्वाती वैद्य, अलका देवडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *