खंडग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार

सोलापूर : अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजीचे हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५
ग्रहण मध्य – रात्री ०१:४४
ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३
ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट ग्रहणाचा वेध शनिवार दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत बाल, वृद्ध, अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१ पासुन वेध पाळावेत
वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
ग्रहणकाळात म्हणजे मध्यरात्री ०१:०५ ते ०२:२३ या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग हे करु नयेत.
ग्रहणातील कृत्ये ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा,तर्पन,श्राद्ध जप,होम,दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण काळामध्ये झोप,मलमूत्रोत्सर्ग,अभ्यंग,भोजन व कामविषयसेवन हे कर्म करू नये सुतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते
पौर्णिमा शुक्रवार रात्री उजाडता शनिवार पहाटे 4:18 मिनिटांनी प्रारंभ शनिवार रात्री उजाडता रविवार 1:58 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

■ ■ ■
कोजागरी आणि ग्रहण

यावर्षी दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असुन रात्री ०१:०५ ते ०२:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल ( दाते पंचांग प्रमाणे वेळ ) अशी माहिती अखिल विरशैव लिंगायत जंगम अर्चक पुरोहित महासभा महाराष्ट्र प्रमुख वेदमूर्ती ईश्वर स्वामी होळीमठ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *