‘ दयानंद ‘ महाविद्यालयातील नाईकनवरे व नवलेची भारतीय नौदलात निवड

सोलापूर : सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून एन.सी.सी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ग्रामीण भागातील तेजस नाईकनवरे व शिवशंकर नवले यांची भारतीय नौदलामध्ये निवड झाली आहे.
दयानंद शिक्षण संस्थेच्यावतीने नाईकनवरे व नवले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे म्हणाले, सतत परिश्रम, चिकाटी, आपल्या कामाकडे योग्य पध्दतीने लक्ष दिले तर सर्व कामांमध्ये यश प्राप्त करता येते. उपप्राचार्य अरुण खांडेकर यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने म्हणाले,नाईकनवरे व नवले या विद्यार्थ्यांचे घरची परिस्थिती हालाखीची असताना, मिळेल ती कामे करुन, गरीब परिस्थितीवर मात करुन भारतीय नौदलात निवड झाल्याने ३८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनला अभिमान असल्याचे सांगितले तेजस नाईकनवरे ( वाफळे, ता.मोहोळ) व शिवशंकर नवले (धोत्री,दक्षिण सोलापूर) या विद्यार्थ्यांचा गावामध्ये व महाविद्यालयात कौतुक होत आहे.यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्राजी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे,उपप्राचार्य अरुण खांडेकर, श्रीकृष्ण माडेकर, कला शाखेचे समन्वयक माधव कुलकर्णी,३८महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे अधिकारी कर्नल विक्रम जाधव, सुभेदार मेजर अरुण ठाकूर,सुभेदार अण्णासाहेब वाघमारे, कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *