31 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादीचे वाचन…

सोलापूर : मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य व अप्पर मुख्य सचिव निवडणूक यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि. 27/10/2023 रोजी प्रसिध्द झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीकरिता वापरावयाची प्रारूप मतदार यादीचे वाचन दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये 4 ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी वाचनास 248 सोलापूर शहर उत्तर 249 सोलापूर शहर मध्य व 251 सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदार संघातील BLO ऑफिसर व सोमपातील विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मयत मतदार, स्थलांतरीत मतदार, नवे मतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार यांची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणेबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
तरी सोमपा हद्दीतील प्रभागात असलेल्या सर्व राजकीय पक्षप्रमुख ,माजी नगरसेवक तसेच मतदारांनी दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी 1 ते 26 प्रभागाचे ठिकाणी होणाऱ्या प्रारूप मतदार यादी वाचनास उपस्थित रहावे मतदार यादी वाचनाच्या ठिकाणांची यादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे.

1 ते 26 या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीचे वाचन ठिकाण खालीलप्रमाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *