‘ फॅन्सी ड्रेस ‘ स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्किड मध्ये अवतरली विविधांगी बालरूपे

सोलापूर : सोलापूरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये ‘ फॅन्सी ड्रेस ‘ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी,परीक्षक रेवा ब्युटी ॲकेडमीच्या प्रमुख शाची चंद्रप्रकाश जोडमाटे, सचिवा वर्षाताई विभुते,व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी प्राचार्या अनिता अनगोंडा उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दि.२ व ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नर्सरी, यलकेजी,युकेजी व पहिली व दुसरीच्या छोट्या किलबिल पाखरांनी छान सहभाग नोंदविला फळे, फुले,भाज्या,प्राणी तसेच देव,दानव या विषयांवर छान वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात चिमुकल्यांनी माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, बाल हनुमान, इस्रोचे चांद्रयान,जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या वेशभूषा करून सदर कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे राणी दळवी,रुपाली कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रिया कसा,स्नेहा देवधारे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्या, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *