जवानांविषयी मुलांमध्ये प्रेम निर्माण करा – तळीखेडे

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम : जवानांसमवेत केली लहान मुलांनी दिवाळी साजरी

सोलापूर : लहान मुलांमध्ये भारतीय जवानांविषयी प्रेम निर्माण झाले तर येणार्‍या काळात त्यांच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा निर्माण होईल विद्यार्थ्यांनी मोबाईल फोनचा कमीतकमी वापर करावा व आई, वडील, शिक्षक,शेतकरी व सैनिक यांचा मान सन्मान करावा असे आवाहन माजी सैनिक अरूणकुमार तळीखेडे यांनी केले.
         श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने सोलापूरातील मजरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली त्याप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरूणकुमार तळीखेडे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे संचालक रावसाहेब मेजर काशिद, सिनियर चीफ विमा प्रतिनिधी केदार स्वन्ने, उद्योजक सुनिल बलदवा, जिल्हा परिषद प्राथमिक मजरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिवानंद भिम्मनवस, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. 
        दिवाळीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने शंकरपाळी, लाडू,चिवडा व चकली आदी फराळाचे पदार्थ व सुगंधी उटणे यावेळी वाटप करण्यात आले देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढलेल्या सैनिकांच्या हस्ते फराळ खाऊ मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला सुत्रसंचालन प्रथमेश कासर यांनी केले तर आभार प्रदर्शन आप्पाशा मुंबसणी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश आळंगे, शामकुमार मुळे, संतोष अलकुंटे, महेश भाईकट्टी, सुरेश लकडे, राजेश केकडे, महेश ढेंगले,अक्षता कासट,अनिता रेळेकर, शुभांगी लचके, माधुरी चव्हाण, तृप्ती पुजारी, प्रकाश राचेटी, बसवराज निंबर्गी, आमसिध्द तिर्थकर, सिराज नदाफ, पदमा पाटील, शक्रिला इनामदार, ललिता राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *