भीमाच्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना लि – टाकळी सिकंदर ता.मोहोळ येथे चालु गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर सकाळी १० वाजुन ३९ मिनिटांनी चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या उपस्थितीत पुळुज गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. महत्वाचं म्हणजे १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतरच बुधवारी हा साखर पूजन कार्यक्रम घेण्यात आला. गळीत हंगाम २०२३-२४ शुभारंभावेळी काटा पेमेंट करण्याचा दिलेला शब्द पाळत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सभासदांना केंद्रस्थानी मानूनच काम करत आहोत हे आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दरम्यान दरवर्षी साधारणतः हंगामाच्या दुसऱ्या दिवशी साखर पोती पूजन कार्यक्रम घेतला जायचा या परंपरेला फाटा देत अगोदर शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल आणि मग साखर पूजन हि भूमिका चेअरमन विश्वराज महाडिक यांनी घेतली सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक शिंदे साहेब,अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड.. एक पगार दिवाळी बोनस खात्यावर जमा..!

भीमाच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ किलो स्वतंत्र पॅकिंगद्वारे मोफत साखर वाटप करून कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के म्हणजेच एक पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याप्रमाणे आज साखर पोती पूजनप्रसंगी दिवाळी बोनस सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला असल्याची माहिती विश्वराज महाडिक यांनी दिली मोफत साखर, दिवाळी बोनस एक पगार यामुळे भीमाच्या कर्मचाऱ्यांची यावर्षीची दिवाळी गोड होणार आहे.

■■■■

भीमा सहकारी साखर कारखान्याने यावर्षी जाहीर केलेली २५२५ रुपये पहिली उचल, चोख काटा आणि रोख मिळणारे पेमेंट यामुळे भीमाला ऊस घालण्याकडे सभासद शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. १ ते ५ दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल जमा करण्यात आली आहे पाच दिवसांचं हे बिलाचे वितरण हंगाम संपेपर्यंत सुरु राहील त्यामुळे उत्तरोत्तर सर्वच शेतकऱ्यांचा भीमाकडे ओघ वाढेल असं चित्र आत्ताच पहावयास मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपास आणण्यासाठी सज्ज राहणार आहे.

चेअरमन विश्वराज महाडिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *