‘ हृदयम ‘ मध्ये मेंदू व आतड्याच्या अवघड शस्त्रक्रिया केल्या यशस्वी 

सोलापूर : सोलापूरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील हृदयम् हार्ट केअर ॲण्ड डायबेटीज सेंटर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी मेंदू आणि आतड्याच्या आजाराच्या रूग्णाची अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाल्याची माहिती या हॉस्पिटलचे प्रमुख ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.शैलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ.अक्षय हवालदार  यांनी उमरगा तालुक्यातील एका सतरा वर्षाच्या मुलीच्या मेंदूची विना टाक्यांची शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले असून याच हॉस्पिटलमधील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. योगेश बंग यांनीदेखील  सोलापूरच्या एका 75 वर्षीय आजीच्या शरीरातील  मोठ्या आतडयाच्या आतील भागातील तसेच हार्निया आणि पेरिटोमेक्टीनी या तीन वेगळ्या प्रकारच्या गंभीर आजारांच्या एकाचवेळी शस्त्रक्रिया यशस्वी करून या आजीलाही अक्षरशः मरणाच्या दाढेतून परत आणले आहे.विशेष म्हणजे या दोन्ही रूग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या.परंतु हा आजार पुन्हा उद्भवला होता त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते मात्र ‘हृदयम’ मधील  या दोन्ही डॉक्टरांनी आपले ज्ञान आणि कौशल्ये पणाला  लावून पुन्हा या रूग्णांची गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया  यशस्वी करून आपले आणि हृदयम हॉस्पिटलचे नाव उज्ज्वल केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना न्यूरोसर्जन डॉ.अक्षय हवालदार म्हणाले, या मुलीवर अगोदर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र परत मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी केली आज ती मुलगी व्यवस्थित आहे. वास्तविक अशा रुग्णांना बरे होण्यास जवळपास पाच ते सात दिवस लागतात परंतु दोन दिवसात तिच्यात सुधारणा होऊन ती घरी गेली. या विनाटाक्यांच्या शस्त्रक्रियेमुळे जखम आणि डाग सुध्दा राहत नाहीत या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य मुंबई-पुण्याहून मागविले होते अतिशय काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करून त्या मुलीला बरे करण्यात आपल्याला यश आले याचे विशेष समाधान आहे.तर कॅन्सर तज्ज्ञ डॉ. योगेश बंग म्हणाले, आतड्याच्या आत मधील झालेली ही सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून यासाठी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील, भूल तज्ज्ञ डॉ. सागर पारगुंडे आणि इतर सहकारी यांची मदत अतिशय मोलाची ठरली.पुणे मुंबईला शंभर टक्के खर्च येत असेल तर या शस्त्रक्रिया अवघ्या 40 टक्के खर्चात करण्यात आल्या आहेत. जास्तीतजास्त रुग्णांना जागतिक मान्यता प्राप्त उपचार आपल्या हॉस्पिटलमधून मिळावेत, एवढाच आपला उद्देश असल्याचेही ते म्हणाले. तसेच या द्वारे शस्त्रक्रिया दोन ते सात तासात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

■■■

शासकीय योजनेतूनन महिनाभरात दीडशे शस्त्रक्रिया केल्या जातात

रूग्णांना पुणे – मुंबईला जाण्याची गरज नाही मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ह्दयममध्ये झालेल्या  आहेत. या ठिकाणी ॲडव्हान्स कॕथलॕब आणि  अद्यावत असे ऑपरेशन थिएटर असून त्या – त्या आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्सदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे  रूग्णांना आता अवघड आणि गुंतागुंतीच्या  शस्त्रक्रियेसाठी सोलापूर बाहेर जाण्याची गरज नाही तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले योजनेसह कर्नाटक सरकारच्यावतीने राबविण्यात येणारी कर्नाटक यशस्वीनी योजना हृदयम मध्ये राबवत असून महिन्याकाठी सरासरी दीडशे रुग्णांची अँजिओग्राफी करून गरज असलेल्या रुग्णांची मोफत एन्जोप्लास्टी करत असल्याचे डॉ .शैलेश पाटील यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *