त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनने केला विडी महिला कामगारांचा सन्मान

सोलापूर : त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून संविधान दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान, कार्यकुशल विडी कामगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे चे राज्य व्यवस्थापक प्रशांतजी वाघमारे उपस्थित होते.
तर व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी व न्यायमंच, सोलापूर चे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश भंडारे, साबळे वाघिरे अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चे सरव्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे व्यवस्थापक सगुतरत्न गायकवाड, साबळे वाघिरे अँड कं.प्रा.लि चे कोषाध्यक्ष श्रीनिवास जोशी, सोलापूर बार असोसिएशन, सोलापूरचे माजी खजिनदार ॲड. चंद्रसेन गायकवाड, ॲड. स्वाती राठोड, माजी पोलीस उपनिरीक्षक संजय मोतिकर, अंकुश राठोड, साबळे वाघिरे अँड कं.प्रा.लिचे सेंटर मॅनेजर मदन आपटे, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन सोलापूर जिल्हा समन्वयक तथा पुणे विभाग अध्यक्ष शितल कांबळे आदी उपस्थित होते.
या वेळी त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे चे राज्य व्यवस्थापक प्रशांतजी वाघमारे यांच्या हस्ते 50 विडी कामगार महिलांचा सन्मानचिन्ह, संविधान उद्देशिका व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना प्रशांतजी वाघमारे म्हणाले की, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन च्या वतीने महिलांकरिता विशेष कार्य केले जात आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना व्यवसाय प्रशिक्षण शिबिर देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे. सोलापूर शहरातील विडे कामगार महिलांनी आपल्या परिस्थितीचा बागुलबुवा न करता मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत मजल मारण्याचे पाठबळ दिले. आज कित्येक विडी कामगार महिलांशी मुले मोठमोठ्याला पदावर कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम सोलापूरातील पोलिस हेड क्वाटर समोर पार पडला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक
मदन आपटे व शितल कांबळे यांनी केले सूत्रसंचालन प्रतीक शिंदे यांनी केले तर आभार अखिला वंगा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्रानी गायकवाड, रुचिता पद्मा, मयुरी ठाकूर, वसुंधरा पवार या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिनींनी व साबळे वाघिरे अँड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *