किनीकदुत बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनीकदु येथे नुकतेच बसवसृष्टी परिसरातील संविधान पार्कचे उद्घाटन आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव तुडमे यांनी रोपट्याला पाणी घालून व सरनाम्याचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सकल लिंगायत समाजाचे महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार हत्तुरे,सोलापूरचे उद्योगपती रेवणसिद्ध बिज्जर्गी,दलितमित्र नितीन शिवशरण, नांदेडचे बसवाचार्य प्रा.आनंद करने,चन्नम्मा ब्रिगेडच्या राज्याध्यक्ष शितल महाजन,बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे,लवराळे, धनराज गौंड,काशिनाथ इसादकर, बसवदर्शिकाचे संपादक सुनील हिंगणे, चंद्रशेखर कत्ते,ऑड सूरज विभुते, एम.के.कस्तुरे, योगेश स्वामी,निवृत्ती कांबळे, संजय पाटील,रवी बिराजदार, पुणे येथील नरसिंग मुळे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक प्रदीप वाले कोल्हापूर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे किणीकदुचे सरपंच व्यंकटराव तुडमे,उपसरपंच सूर्यकांत कोकाटे,अहमदपूरचे राजकुमार मजगे, प्रा.गोविंद शेळके,हरिदास तम्मेवार उपस्थित होते.

यावेळी आ.बाबासाहेब पाटील म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मीती करताना समाजाच्या सर्व घटकांना विचारात घेतले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समानता प्रस्थापित केली. किनी कदु येथे प्रा.भीमराव पाटील यांच्या संकल्पनेतून मोघा रोडवर मोघा धरणाच्या काठी निसर्ग रम्य परिसरात बसव सृष्टीचे निर्मिती केली जात आहे. महात्मा बसवेश्वरांचा ११ फुटी पुतळा, शांतिभवन गुहा, शरणभवन,वचनवन,वचन स्तंभ,अक्कमहादेवी पुतळा, शरणग्राम, वनराई, महाद्वार, पर्यटक निवास,दासोहभवन अनुभव मंटप, ग्रंथालय, म्युझियमची निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ४०० वृक्षांचे संवर्धन करून ऑक्सिजन झोनची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.भीमराव पाटील,शिवदास पाटील, राजकुमार बिराजदार, रमाकांत पाटील,उमाकांत पाटील,विठ्ठलराव गुडमे,प्रा. व्यंकटेश पाटील,दत्ता गिरी, कोंडिबा हारगिले,राहूल सोनकांबळे,संजय पाटील, संग्राम पाटील,बालाजी विठ्ठल भुरे,शिवप्रसाद पाटील, मारोती हिप्पळगावे,परमेश्वर भुरे,विश्वंभर मटके,राहूल शेंबाळे,राजेश्वर भुरे,विलास भुरे,दिलीप सावरगावे, ज्ञानेश्वर तुडमे,विशाल कोकाटे,शिवाजी भुरे,भास्कर भुरे, राजेंद्र भुरे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *