धान्य व फुड्स मशिनरीचे ६ ते ८ डिसेंबरला सोलापुरात भव्य प्रदर्शन भरणार

नवउद्योजक,शेतकऱ्यांना व अत्याधुनिकीकरण करणाऱ्यांसाठी उपयुक्त प्रदर्शन

सोलापूर : धान्य व फुड्स मशीनचे भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन मिलेट टेक एक्स्पो व ग्रेन इंडियाचे तेरावे प्रदर्शन सहा ते आठ डिसेंबर रोजी सोलापुरातील विष्णू मिल कंपाउंड ग्राउंडवर हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळेत होणार असल्याचे सोलापूर डाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा आणि सचिव लक्ष्मीकांत तापडिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेल्वे स्टेशन जवळील विष्णू मिल कंपाउंडच्या ग्राउंड वर हे प्रदर्शन होत असून एडामास इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड द्वारे जवळपास १०० पेक्षा अधिक कंपन्या भाग घेणार आहेत डाळी, तांदूळ, गहू, मिलेट्स, मसाले, मैदा,बेसन, गहू, पोहे, शेंगदाणे, मका, काजू, ऊस अशा विविध प्रकारच्या धान्यांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी मशिनरी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे सरकी, सोयाबीन अशा विविध बियांपासून बनणारे तेल ज्या मशीन मधून तयार होते ती मशिनरी देखील या प्रदर्शनात पाहायला मिळेल. सोलापुरात डाळ मिल ओनर्स असोसिएशन गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे या प्रदर्शनात नव्याने उभारण्यात येणा-या डाळ मिलसाठी तसेच यंत्रसामग्री साठी सबसिडी मिळवून देणाऱ्या कंपन्यादेखील सहभागी होत आहेत. या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या नवउद्योजक तरुणांना तसेच शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व यंत्रसामग्री प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. धान्य उत्पादन व गुणवत्ता वाढ तसेच उत्पादनाला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे डाळी आणि विविध धान्यांवर प्रक्रिया करणारे नवीन उद्योग सुरू होण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष भुतडा यांनी स्पष्ट केले केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर (भरडधान्य) म्हणून जाहीर केले आहे विविध मशिनरीचे थेट प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे सोलापूरसह लातूर,धाराशिव,गुलबर्गा, विजापूर या सोलापूर जिल्ह्याच्या परिक्षेत्रातील जिह्यांमधील डाळ मिल ओनर्सना त्यांच्या कारखान्यांमध्ये अत्याधुनिकीकरण करण्यासाठी या यंत्रसामुग्रीचा उपयोग होणार आहे. जागतिक भरडधान्याचे मार्केट २०२० मध्ये ९.९५ बिलियन डॉलर्स होते हेच मार्केट २०२८ पर्यंत १४.१४ बिलियन डॉलर्स म्हणजे ४.४१% वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे शहरातील लोकांना हेल्दी फूडकडे वळवणे, तसेच भरडधान्य हे न्यूट्रिशनसाठी सुपीरियर असल्याने त्याची उपयुक्तता पटवून देणे, इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगली असणारी भरडधान्य लोकांना खाण्यासाठी उद्युक्त करणे अशी उद्दिष्टे युनोने इंटरनॅशनल एअर ऑफ मिलेट्स- २०२३ जाहीर करताना ठेवली आहेत या कार्यक्रमाच्या आयोजनात ज्येष्ठ सभासद राजेंद्र तापडिया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा व सचिव लक्ष्मीकांत तापडिया यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस नितीन घटोळे, राहुल सोमाणी,अक्षय जव्हेरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *