सिध्देश्वर बँक व बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रख्यात वक्ते वसंत हंकारे यांचे व्याख्यान

१४ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व्याख्यान

सोलापूर : सोलापूरातील बँकींग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍या सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेने नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने बँकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर सिद्धेश्वर बँक व सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील एक परिवर्तनशील प्रखर आणि वास्तववादी वक्ते वसंत हंकारे यांचे “बाप समजवून घेताना” या विषयावर, वय वर्षे १३ ते २० या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे कॉलेज पटांगण (फार्मसी कॉलेज) कॅम्पस जुळे सोलापूर येथे सकाळी ८:०० वाजता वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या प्रेरक व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम श्री. स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणी वळसंगचे अध्यक्ष व सोलापूर सिद्धेश्वर बँकचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या उपक्रमास प्राचार्य अरुण दि. जोशी (संस्थापक इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर) आणि माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे हे सांगली जिल्ह्य़ातील असून पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरक वक्ता असून अभ्यास कसा व का करावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करतात तर जिद्द, चिकाटी, संघर्ष, अथक परिश्रम, यश-अपयश म्हणजे नेमकं काय याचे सविस्तर विश्लेषण या कार्यक्रमातून मुलांना मिळेल. पौगंडावस्थेत शरीरात प्रचंड बदल होत असतात. मनाची अवस्था देखील बदलत असते, यासंदर्भात परिणामकारक योग व ध्यान अभ्यासशारीरिक आकर्षण या वयातील मुलामुलींना होत असते. त्यामुळे लैंगिक विषय कसा हाताळावा याचेही सखोल मार्गदर्शन या व्याख्यानातून विद्यार्थी घेऊ शकतील.
आजची पिढी ही मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत चालली आहे. सध्याच्या पिढीला योग्य मार्ग दाखवत सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा याचे आत्मचिंतन विद्यार्थ्यांना व्हावे हा उद्देश समोर ठेवून वसंत हंकारे हे महाराष्ट्र भर “संस्कारदीपोभव:” या नावाची कार्यशाळा आयोजीत करीत असतात. आजचा विद्यार्थी उद्याचा संस्कारक्षम माणूस कसा बनेल मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण व नैसर्गिक कौशल्य यांची जाणिव करून देणारे उद्बोधक विचार देऊन, आई वडील आणि कुटुंबासमवेत नातं दृढ करून कस जगाव हा विचार विद्यार्थ्यांना देऊन मुलांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देणारे व्याख्यान सोलापूर सिद्धेश्वर स. बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
अशा व्याख्यानास दिड ते दोन हजार विद्यार्थी उपस्थित असतात त्यामुळे शहरातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी बँकेचे अधिकारी प्रमोद नारायणकर 7020243749 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपल्या शाळेतील किती विद्यार्थी सहभागी होतील या नियोजनाच्या दृष्टीने माहिती द्यावी. सहभागी होणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यास बँकेच्या वतीने अल्पोपाहाराची सोय करण्यात आली असून सर्वांसाठी प्रवेश खुला असणाऱ्या या व्याख्यानाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे व सरव्यवस्थापक रामलाल शर्मा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *